पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : घरात कोणी नाही या संधीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
दि. ०७ रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने घराचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले आहेत.
आरोपीवर भादवी कलम ४५४,३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाभाडे हे करत आहेत.












