पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २६ : गेल्या महिन्या भरात पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईत आरोपींची कोम्बिंग ओपरेशन दरम्यान चेकिंग करण्यात आली आहे. या वेळी शहरातील विविध ठिकाणाहून २,११६ जणांची झाडाझडती तर ६०२ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार दि.२५ रोजी रात्री १०:३० ते बुधवार दि.२६ मध्यरात्री १ वाजे पर्यंत करण्यात आली. पुणे शहरातील सर्व पोलीस स्थानक व गुन्हे शाखेच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली आहे.
विशेष मोहिमे दरम्यान पुणे पोलिसांकडून एकूण १० आर्म ॲक्ट गुन्ह्यांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून १ गावठी पिस्टल,दुचाकी मोपेड, मोबाईल,चामडी पाकीट, तसेच १० धारदार हत्यारे असा एकूण १,६५,१४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहरातील परिमंडळ १ ते ५ अंतर्गत पोलीस स्थानकाकडील मुंबई प्रोव्हीबीशन ॲक्टच्या ४४ कारवाईत ४६ जणांना अटक, मपोका क १४२ अंतर्गत ७ कारवाईत ७ जण अटक,जुगार ॲक्टच्या १३ कारवाईत २८ जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच एनपीडीएसच्या १ कारवाईत १ आरोपीला अटक करून पाच हजार रुपये किंमतीचा २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच ५७१ हॉटेल,लॉजेस,गेस्टहॉउस व १५५ एसटी स्टँड, रेल्वे स्थानक व निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली आहेत. वाहतूक शाखे कडून ९३४ संशयित वाहन चालकांना चेक करून २१३ वाहन चालकांवर कारवाई करून १,४६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परि-१ संदीप सिंह गिल्ल,पोलीस उपायुक्त परि-२ स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परि-३ सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परि-४ शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परि-५ विक्रांत देशमुख,पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने सदर मोहिमे दरम्यान पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः कोम्बिंग ओप्रेशन व नाकाबंदी सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे.












