पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.२३ : कोयता गँग मधील गुन्हेगारी आपल्यासाठी नवीन नाही. कोयता गँग मधील चार आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोहम पद्माकर काळे ( वय २३ रा.पसायदान नगर,वडगाव रोड,आळंदी पुणे ) असे फिर्यादीचे नाव असून चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शामा विटकर,ज्ञानेश्वर बडगे,राकेश काळे,अजय देवरस सर्व ( रा.पद्मावती झोपडपट्टी आळंदी ) अशी सर्वांची नावे आहेत.
दि. १९ रोजी ०५:३० वाजता ( योगीराज चौक, देहूफाटी,आळंदी )येथे फिर्यादी हे स्वतःच्या फळांच्या स्टॉलमध्ये होते. या ठिकाणी त्यांच्या दुकानावर त्यांच्या तोंड ओळखीचे इसम आले. मोटर सायकल वरून येत अजय देवरस याने फिर्यादी यांना कोयता दाखवत म्हणाला आम्ही कोयता गँगची माणसे आहोत. आळंदी चा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे. तसेच शामा विटकर याने तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला रोजचे दोनशे रुपये हप्ता दे. नाहीतर तुझे दुकान तोडून टाकू असे धमकी दिली.
आरोपींवर भादवि कलम ३८४,३८५,३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक ननावरे हे करत आहेत.












