कौटुंबिक न्यायालय पुणे येथे सर्व कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश परीक्षेच्या स्पर्धकांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.या व्याख्यानमालेत ज्येष्ठ वकील आणि माजी न्यायाधीशांच्या व्याख्यानांचा समावेश करण्यात आला होता.
दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे दि. १४ जून २०२३ ते दि.२० जून २०२३ पर्यंत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.शिकाऊ वकील आणि जे नुकतेच वकील झाले आहेत त्यांच्यासाठी या व्याख्यानमाला आयोजित होत्या.त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा यामागील उद्देश होता.
या व्याख्यान मालिकेत व्यक्ते म्हणून जेष्ठ विधीज्ञ अॅड. अजित कुलकर्णी दिवाणी प्रक्रिया संहिता आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याची मांडणी भारतीय पुरावा कायद्यानुसार या विषयावर व्याख्यान केले. तसेच अॅड. अनघा जोशी (माजी न्यायाधीश) यांनी चाईल्ड कस्टडी या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. अभय आपटे (ज्येष्ठ विधीज्ञ ) यांनी सहसंमतीने घटस्फोट व मुलांची परदेशी कस्टडी व अंमलबजावणी यावर व्याख्यान केले. डॉ. अॅड. उदय प्रकाश वारूंजीकर (ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय, सदस्य बार काउंसल महाराष्ट्र व गोवा) यांनी विवाह संबंधीत खाजगी आंतरराष्ट्रीय कायदा व हिबीअस कॉरप अशा विविध विषयांवर वकिलांना मार्गदर्शन केले. मुस्लीम लॉ या विषयावर अॅड. अहमद खान पठाण (सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा) व अॅड. सुधाकरराव आव्हाड (ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ) यांनी वारसा हक्क कायद्याचे न्यायालयीन निर्णयाच्या दृष्टीने अस्तित्व निमिर्ती, सातत्य समाप्ती व वाटपाचे न्यायिक समालोचन यावर भाष्य केले.
या उपक्रमाला वकिलांकडून तसेच शिकाऊ वकिलांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला. नवीन उत्तीर्ण झालेले वकील, तसेच शिकाऊ वकील कोणत्याही केससाठी गुगल सारख्या यंत्रणेचा वापर करतात. यामुळे पुस्तक वाचन कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडावी तसेच त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असे दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे, यांनी सांगितले.
या व्याख्यानमालिकेच्या आयोजनात दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे,अॅड. निवेदिता कुंटे [उपाध्यक्ष], मिनाक्षी डिंबळे [सचिव},अॅड. राधिका पुरोहित [उपाध्यक्ष],अॅड. शानूर शेख [खजिनदार], तसेच सभासद अॅड.अपर्णा मोरे,अॅड.संध्या फडतरे,अॅड. सविता यादव अॅड. आम्रपाली कसबे,अॅड. लीना किराड यांचा समावेश होता.
कौटुंबिक न्यायालय पुणे येथे आयोजित व्याख्यानमाला संपन्न












