उन्हाळा आला कि क्रिकेट खेळ हा खेळलाच जातो. क्रिकेट खेळ खेळण्यांमध्ये अधिक उत्साही तरुण वर्ग आपल्याला दिसतो. तरुण वर्गाचा कल गुन्हेगारी च्या दिशेने सुद्धा अधिक असल्याचा दिसत आहे. बिबवेवाडी मध्ये क्रिकेट च्या मैदानावर बुधवारी दिनांक २२ रोजी दहशत आणि मारहाणीची घटना घडली. फिर्यादी अंकित सैन ( रा. बिबवेवाडी) हे त्यांच्या काही मित्रांसोबत मैदानावर क्रिकेट खेळात असताना, अज्ञात ५ आरोपी तिथे येऊन त्यांना क्रिकेट बंद करण्यास सांगितले. फिर्यादी खेळ बंद करून जात असताना अज्ञात आरोपीनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण केली. तसेच कोयता दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला .फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केली
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा भादविक ३२४,३२३,५०४,५०६,४२७,१४३,१४४,१४७,१४८,१४९ तसेच महा.पो.का.क ३६(१) १३५ आणि आर्म ऍक्ट (४)२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी एका विधिसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
क्रिकेट बॅट ने मारहाण करत कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न












