पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२५ : खडकवासला धरण परिसरात सततच्या पावसामुळे धरण क्षेत्र १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५ वा. खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात न उतरऱ्यांच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नदीपात्रात साहित्य किंवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. व सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
खडकवासला धरण क्षेत्र १०० टक्के भरले












