पुणे शहरालगतच्या घाट भागात संततधार पाऊस सुरू आहे. त्याचा फायदा पुण्यातील धरणांच्या पाणीपातळीला झाला आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आता टेमघरमध्ये ०.७ टीएमसी म्हणजे २१.१८ टक्के, वरसगावमध्ये ४.५१ टीएमसी म्हणजे ३५.१८ टक्के, पानशेतमध्ये ३.५ टीएमसी पाणीसाठा ३६.५५ टक्के आहे; आणि खडकवासला येथे ०.९० टीएमसी पाणी म्हणजेच ४५.७२ टक्के आहे.
धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी शहराला वर्षभर पुरेसा नाही. पाण्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे.
खडकवासला धरण पाणीपातळीत वाढ : वरसगाव आणि पानशेत धरणांमध्येही चांगल्या पाणीपातळीची नोंद












