हडपसर, दि.२० : फुरसुंगी येथे एका इसमास पाठीमागून आलेल्या दोन मोटर सायकलवरील पाच अनोळखी इसमाने धारदार हत्याऱ्याने सपासप वार करून जागीच ठार मारल्याची घटना (ता.16) घडली आहे. वैभव गायकवाड असे मृत तरुणाचे नाव असून आरोपीन विरोधात हडपसर पोलीस ठाणे येथे कमल ३०२,१४३,१४४,१४७,१४९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३६ (१)१३५,भारतीय हत्यार कायदा ४ ( २५ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आरोपी प्रतीक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत काटे व स्वराज दोरगे हे गुन्हा झाल्यानंतर फरार झाले होते. लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून व वैराग,इर्ले, सुर्डी, माळवंडी या ग्रामीण भागात स्थानिक नागरिक पोलीस पाटील यांच्या मदतीने सोलापूर हायवे ने जात असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली.
आरोपींचा पाठलाग करत असताना आरोपी प्रतीक पोपट कामठे (वय २४ रा. बेंदवाडी,फुरसुंगी), शुभम सुधाकर गायकवाड (वय २१ रा. सदर),(आशितोष उर्फ सोन्या शरद पोटे (वय २१ रा.जैन नगर, फुरसुंगी), स्वराज सुनील दोरगे (वय १९ रा. सदर), अनिकेत ज्ञानेश्वर काटे (वय १९ रा. सदर) यांना बोरीबेल दौंड येथून ताब्यात घेण्यात आले. व आरोपींची चौकशी दरम्यान मयत वैभव गायकवाड याच्या बरोबर उसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त श्रीकांत देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डागळे, तपास पथकाचे पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे,
पोलीस अमलदार राठोड, पांगळे, जाधव, शेख,दुधाळ, पवार, पंधरकर, मदने, हंबर्डे,सोनावणे,गोरखे, सुरवसे टोणपे, दणके, शेख,केसकर, रेजीतवाड यांच्या पथकाने केली.












