अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. हि घटना गुरुवारी (दि २९) रोजी रात्रीच्या सुमारास येरवडा येथील खाऊ गल्ली येथे घडली आहे.
निलेश अरुण कोंढवळे (वय-27 रा.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्म अॅक्ट , महाराष्ट्र पोलीस अॅक्टनुसार
येरवडा पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलादार स्वप्नील मराठे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, खाऊ गल्ली येथे दोन जण संशयी पद्धतीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर थांबले आहेत. येरवडा पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला.
आरोपीची चौकशी केली असता बुधवारी (दि २८) रोजी रात्री 11 वाजतेच्या सुमारास पिंपरी येथून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या एकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आयपीसी 341, 120(ब), 507, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम , पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे , पोलीस अंमलदार गणपत थोकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले, स्वप्निल मराठा, मोहन गिरमे, प्रविण माळे, तेजस पवार, अनिल अहिवळे यांनी केली आहे.
खुनाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरबंद












