मुंढवा पोलीस ठाण्यात गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी योगेश प्रकाश नागपुरे, (वय ३५ वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा) हा गुन्हा दाखल झाल्यापासून गेली ८ महिन्यापासून पोलीसांना चकवा देत राज्य, परराज्यात फिरत होता. आरोपी याच्यावर गुन्हा रजि. नंबर २८२ / २०२२ भादंवि कलम ३८४, ३८७, ३४१, ४५२, ५०६, ३२३, १४३, १२० ( ब ) प्रमाणे मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
मुंढवा पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फेत आरोपी योगेश नागपुरे हा ए.बी.सी. चौक, मुंढवा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचे सुचनांप्रमाणे सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे व तपास पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार व गंभीर गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी योगेश प्रकाश नागपुरे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांच्या आदेशान्वये व मा.सहा.पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली,मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक श्री.प्रदिप काकडे यांचे सुचानाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, सचिन पाटील यांचे करवी यशस्वी सापळा कारवाई केली आहे.
गंभीर गुन्हयातील आरोपी मुंढवा पोलिसांच्या अटकेत












