पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : गणेशोत्सवासाठी काहीच दिवस उरले असताना या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव नियोजनासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दि. १० रोजी दुर्वांकुर सभागृह, टिळक रोड येथे परिमंडळ एक मधील सर्व गणेश मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत परिमंडळ एक मधील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवा दरम्यान येणाऱ्या समस्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्या. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकी दरम्यान मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०१ श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, श्री. विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, श्री. आर. राजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मिटिंगच्या शेवटी पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांनी उपस्थितांना सुचना वजामार्गदर्शन केले व येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले.
सदर बैठक ही मा. पोलिस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- ०१ श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, श्री. विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे, श्री.आर.राजा, सहा.पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग श्री वसंत कुवर, सहा पोलिस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर, श्री. अशोक धुमाळ, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे- ०१, पुणे शहर, श्री. सुनिल तांबे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे – ०२ पुणे शहर, श्री. सतिश गोवेकर, सहा पोलिस आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर, श्री. सैय्यद, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना, पुणे, श्री. चुडाप्पा, पोलिस निरिक्षक, गुन्हे विश्रामबाग श्री. दादासाहेब गायकवाड, पोलिस निरिक्षक, गुन्हे, फरासखाना, पुणे श्री. मंगेश जगताप तसेच विशेष शाखा व पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांचे उपस्थितीत पार पडली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरीक्षक, खडक पोलिस स्टेशन, श्री. सुनिल माने यांनी केले.












