पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : साध्य संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. पुणे पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोणता हि अनुसूची प्रकार घडू नये म्हणून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशातच कात्रज घाट परिसरातून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
सतीश गुलाबराव शेकरे (वय २३ रा. शिंदेवाडी, शिरवळ,ता. खंडाळा, जि. सातारा मु.पो. जि छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणेश उत्सवाच्या काळात भारती विद्यापीठ ठाण्याच्या हद्दीत पोलीसचे पेट्रोलिंग सुरु होते. पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना गुप्त बातमी मिळाली कि कात्रज घाटातील
भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपावर एक इसम कमरेला पिस्टल लावून थांबला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडून ४० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, सहाशे रुपये किंमतीचे ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मर्तना पाटील, सह पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सह पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, अवधूत जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केले आहे.












