पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ :मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिवपदी “राज्य लोकतंत्र” चे संपादक गणेश आत्माराम मोकाशी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली..
त्यांनी श्री. गणेश मोकाशी यांच्याकडे पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.. वरील जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी गणेश मोकाशी प्रयत्न करतील..
उच्च विद्याविभूषित असलेले गणेश मोकाशी यांनी जर्नालिझमची पदवी संपादन केलेली आहे.. राज्य लोकतंत्र या दैनिकाच्या संपादक पदाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहेत..
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी गणेश मोकाशी यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












