औरंगाबाद, दि.०४ : 2 ऑगस्ट रोजी सकाळी 12 ते 2 दरम्यान आनोखे आंदोलन करण्यात आले. वाल्मिक समाजाच्या वतीने “गळ्यात मडकं पाठीला झाडू” लावून मुक आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोहाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे वाल्मिक समाजाचे एन.एस.के.एफ.डी.सी. चे कर्जाचे प्रकरण किमान १० ते १२ वर्षांपासून प्रलंबित आहे, याची गाभिर्याने दखल घ्यावी.
दि. ०२/०८/२०२३ रोजी सकाळी १२ ते ०२ वाजेपर्यंत मा. जिल्हा व्यवस्थापक जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपूरा, औरंगाबाद या कार्यालयासमोर वाल्मिक समाजाच्या वतीने “गळ्यात मडकं पाठीला झाडू” लावून मुक निदर्शन लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. वाल्मिक समाजाचे कर्जाचे प्रकरण दहा वर्षापासून स्थळ पाहणी व LY नंबर साठी प्रतिक्षा करीत आहे. याची गांभिर्याने नोंद घ्यावी. प्रलंबित असल्याने ते तात्काळ निकाली उमेदवाराला कर्ज देण्यात यावे. काढून पात्र प्रकरणात जातीने लक्ष देवून आमचे राहिलेले वाल्मिक समाजाचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढल्यास वाल्मिक समाज आपला अत्यंत आभारी राहील.
अन्यथा दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी मा. व्यवस्थापक संचालक कार्यालय महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय, जुहू मुंबई या ठिकाणी वाल्मिक समाजाचे आमरण उपोषण करण्यात येईल. मा. मुख्यमंत्री साहेब, तसेच उप-मुख्यमंत्री साहेब आपणास वाल्मिक समाजाच्या वतीने विनंती करण्यात येते की महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ कार्यालय ची तपासणी करून वाल्मिक समाज मागच्या २०१३ पासून न्यायाची वाट पाहत आहे. आता तरी वाल्मिक समाजाला न्याय दयावे असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले आहे.
एन.एस.के.एफ.डी.सी. २०१२ चे वाल्मिक समाजाचे कर्जाचे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावणे. इतर समाजातील महामंडळ स्थापित करण्यात आलेले आहे. तसेच वाल्मिकी समाजासाठी वेगळे महामंडळ स्थापित करण्यात यावे. लाभार्थी निवड समितीच्या मिटिंगमध्ये मंजूरी नसताना यांनी कर्ज प्रकरणे प्रादेशिक कार्यालय व मुंबईला पाठविले आहेत याची चौकशी करण्यात यावी.या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी ओमपाल चावरीया, सोमवीर चव्हाण सुरेश बावत, राजपाल सौदे, सतीश कागठा, विशाल चारण, राहुल चावरिया, अजय परोचा, प्रितेश चवरिया, शिवा पोहळ हे आंदोलनात सहभागी झाले होते.












