पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त करत असताना पोउनि साळवे यांना बातमीदारा बातमी मिळाली की कोल्हापुर येथील एक रेकॉर्डवरील पाहीजे असलेला आरोपी इराणी वस्ती येथे आलेला आहे. सदर बातमीचा आशय वरीष्ठांना फोन द्वारे कळवला असता त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईचे तोंडी आदेश दिले.
त्याअनुषंगाने खाशाबा जाधव ग्राऊंड, इराणी वस्ती, शिवाजीनगर येथे बातमीप्रमाणे एक इसम संशयास्पदरित्या पायी पेट्रोलींग दरम्यान मिळुन आला असता त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने त्याचे नाव आर. सरगिरो ऊर्फ दादु ऊर्फ राजा भवानी ऊर्फ रझा हुसेन इराणी, वय-28 वर्षे, राहणार- इराणी वस्ती, राजा आली जन्नत नगर, ता. धारवाड विजयागिरी, जि. हुबळी राज्य कर्नाटक असे सांगितले. शिवाजीनगर पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी शाहुपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापुर येथील पाहिजे अरोपी असल्याचे समजले.
सदरची कामगिरी मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. सन्दीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त, परि-01 पुणे शहर, मा. वसंत कुंवर, सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक प्रताप साळवे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे, ग्रेड पोलीस उपनिरिक्षक सावंत, सपोफी मिवरे पोहवा / 5415 राजपुत, पोहवा / 5720 सोनवणे, पोहवा / 836 साठे, पोहवा / 4473 शिंदे. पोना / 7705 कांबळे यांनी केलेली आहे












