पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१३ : गाडीची तोडफोड करत मोबाईल पळवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
एका व्यक्तीने तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या भावासोबत श्रमिक भवनाच्या समोरील फुटपाथ जवळ शिवाजीनगर येथे थांबले होते. तेव्हा तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या जवळ येऊन त्यांच्या गाडीचे दगडाने नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या मावस भावाचा आठ हजार रुपयाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.
आरोपींवर भादवि कलम ३९२,४२७,३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे हे करत आहेत.












