पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२३ : तुला दाखवतो मी कोण आहे,असे म्हणत विमानतळ परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळी प्रमुखासह दोघांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ५२ वी मोक्का कारवाई आहे.
प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (वय २५ रा. वडगाव शेरी), अरबाज अयुब पटेल (वय २५ रा.नागपूर चाळ, येरावडा), बबलू संतोष चव्हाण (वय २२ रा.संजय पार्क, विमान नगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. हातगाडी चलकाला धमाकावून गल्ल्यातील तीन हजार रुपये जबरदस्तीने नेल्या प्रकरणी सदर आरोपींवर विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस तपासा मध्ये आरोपीन विरोधात गायकवाड (टोळी प्रमुख) ८ गुन्हे, पटेल विरोधात ६ गुन्हे, चव्हाण विरोधात ४ गुन्हे दाखल आहेत. सदर टोळी प्रमुखाने व इतर साथीदराने टोळी बनवून गंभीर दुखापत, जबरीचोरी, दरोडा, घटक शस्त्र जवळ बाळगणे, अशा प्रकारे सदर परिसरात दहशत निर्माण केली होती.
या प्रकरणी आरोपीं विरोधात भा. द. वी. कलम ३९२,३५२, ४२७,५०४, ५०६,३४ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम ३(१) (ii), ३(२), ३(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह. पोलीस आयुक्त येरावडा विभाग, संजय पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परी – ४ शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक संगीता माळी, सह. पोलीस निरीक्षक मिलिंद पठक,पोलीस उप निरीक्षक एस. एस कोळ्ळूरे, पोलीस हवालदार उमेश धेंडे,पोलीस अंमलदार भोर, शिंदे यांनी केले आहे.












