पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : शहरात सध्या गुंगीचे औषध देऊन चोरी करण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे अशीच एक घटना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
फिर्यादीने एका अनोळखी इसमा विरूध्द तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हे एक रिक्षा चालक असून ते त्यांची रिक्षा नाना पेठ व कॅम्प परिसरामध्ये चालवत असतात. फिर्यादी हे एम.जी रोड येथे रिक्षा थांबवून पॅसेंजर ची वाट बघत असताना आरोपी त्यांच्या जवळ आला आणि पेशंटला घेऊन हडपसर येथे जायचे आहे असे सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार फिर्यादी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे घेऊन गेले. त्यानंतर आरोपीने तेथे रिक्षा थांबवून फिर्यादी यांना रसाच्या ज्यूस मध्ये गुंगीचे औषध दिले. आणि फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातात दोन अंगठ्या असे एकूण दोन लाख सात हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
आरोपीवर भादवि कलम ३७९,३२८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले हे करीत आहेत.












