पुणे दि.११
पुणे शहरातील हडपसर परिसरात अवैध्य दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विक्रेत्यांना पोलिसांचा तथा कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. यामध्ये आता महिलांचा अधिकाधिक सहभाग देखील नोंदवण्यात आला आहे.
अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थान बध्दतेची कारवाई करत असतात. अशीच एक कारवाई हडपसर पोलीस हद्दीतील महिला आरोपीच्या विरोधात करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांची एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थान बध्दतेची हि ३९ वी कारवाई आहे.
सौ.सुमन संजय कडमंची (वय ४१, रा हिंगे मळा, हडपसर) हि आरोपी महिला तिच्या ३ साथीदारांसोबत हडपसर परिसरामध्ये बेकायदेशीर भेसळयुक्त ताडी विक्री करताना आढळून आली आहे. तसेच मागील पाच वर्षांमध्ये आरोपी विरोधात ८ गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या या गुन्ह्यातील सहभागामुळे जवळील परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हडपसर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
हडपसर पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून आयुक्तांनी आरोपी महिलेला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृह, येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तत्कालीन हडपसर पोलीस स्टेशन, श्री. अरविंद गोकुळे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके व हडपसर पोलीस तसेच पी.सी.बी. गुन्हे शाखेचे उप निरीक्षक राजू बहिरट यांनी केली आहे.
गुन्हेगारांना आता स्थानबद्धतेचा धाक : पुणे आयुक्तांची ३९वी कारवाई












