पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान ( वय ५०, रा. आयना मस्जिद समोर, ए. डी. कॅम्प चौक, ११४०, भवानी पेठ, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने त्याच्या साथीदारां सह समर्थ, कोंढवा आणि खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.धारधार सुरा चाकू, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला करणे, दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील पाच वर्षांपासून अकरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पण परिसरात असलेल्या त्याच्या दहशतीमुळे नागरिक पुढे येऊन तक्रार दाखल करत नव्हते.त्याच्या विरुद्ध दाखल आलेल्या गुन्ह्यांची तपासणी करून त्याला एम.पी. डी. ए. कायद्या अंतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आवाहन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांच्याकडून करण्यात आले होते.
त्यांनी दिलेल्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन पुणे श्री सुरेश शिंदे, व पोलीस उप निरीक्षक, पी.सी.बी. शाखा, पुणे शहर गुन्हे श्री. राजु बहिरट यांनी कामगिरी पार पाडली आहे.












