पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : घरकाम करणाऱ्या महिलेने सुनेचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून फिर्यादी महिलेने एका अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी या त्यांच्या कुटुंबासमवेत शिवाजी हौसिंग सोसायटी पुणे येथे राहतात.त्यांच्याकडे घरकामा साठी म्हणून येणाऱ्या महिलेने त्यांच्या सुनेच्या बेडरूम मधील कपाटात असलेले २,००,००० किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे.
आरोपी महिलेवर भादवी कलम ३८१ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाळके हे करत आहेत.












