पुणे, दि. ११ : पुण्यात घरफोडीच्या प्रकरणा मध्ये वाढ होताना दिसून येत आहे.अशीच एक घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
सादिक मुल्ला, वय ३० वर्षे, रा. आंबेगाव खुर्द, पुणे यांनी एका अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. ०७ रोजी फिर्यादी यांच्या बंद घरात प्रवेश करून आरोपीने कपाटातील दोन लाख पन्नास हजार रुपये त्यांच्या संमती शिवाय चोरून नेत घरफोडी केली आहे.
आरोपीवर भादवी कलम ३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार आर.के.गोसावी हे करत आहेत.












