पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१८ : गेल्या काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी तीन विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत फिर्यादी जयश्री मगर यांनी दि.२ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठ पोलीसात तक्रार दिली होती.
घटना स्थळावरील सी.सी.टीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलीसांचा तपास सुरु होता. सदर गुन्ह्यात तीन विधीसंघर्षित बालके असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश बारावकर, निलेश ढमढेरे व चेतन गोरे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपींकडून १ लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व महागडी घरगुती भांडी जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीने फिर्यादी यांच्या घरीचे कुलूप तोडून कपाटातील दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झाले होते. आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात भा.द.वि.कलम ४५४,३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परी-२ स्मार्ताना पाटील, सहा.पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर,यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार,पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस निरीक्षक धीरज गुप्ता, वर्षा घोगरे, पोलीस अमलदार महेश बारावकर, सचिन गाडे, सचिन सरपाले, मंगेश पवार, हर्षल शिंदे, शैलेश साठे, अवधूत जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, नितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत, यांच्या बातमी केली आहे.
घरफोडीच्या दोन गुन्ह्याची पोलिसांकडून उकल












