पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या दोन पथकाने अटक केली आहे. तसेच ५ घरफोडीचे गुन्हे देखील उघड झाले आहे. त्यांच्या कडून ७ लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी आदेश दिले होते.
राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर व राहुल उर्फ लल्या हिरामण लष्करे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. घरफोडी व चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सदर आरोपींनी (दि.२६) ऑगस्ट रोजी काटे ईस्टेट, चोविसावाडी चाऱ्होली परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसा एकाच वेळी सहा ठिकाणी घर फोडून चोरी केल्याची घटना घडली होती.
सराईत गुन्हेगार राहुल उर्फ लल्या हिरामण लष्करे याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. दोन्ही आरोपी सराईत घरपोडी चोरी करणारे असून गुन्हा केल्या नंतर स्वतःचे अस्थित्व लपवून फिरत होते. तपास पथकातील शिवानंद स्वामी यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीवरून (दि.२२) सप्टेंबर रोजी युनिट दोनच्या पथकाने त्यांना निगडी परिषद आले असताना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी दिघी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले दोन घरपोडीचे गुन्हे तसेच चिंचवड, लोणीकंद,शिरवळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकूण पाच घरपोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून सात लाख रुपये किमतीचा एवस यामध्ये नऊ तोळे सहाशे ग्राम वजनाचे सोन्याचे व साडेचारशे ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने दुचाकी वाहन असा चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट २ करत आहेत.












