पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२१ : गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना पुणे शहरात घडल्या होत्या. या प्रकरणी युनिट -२ कडून एकाला अटक करण्यात आले आहे. जयवंत ऊर्फ जायड्या गोवर्धन गायकवाड (वय ३४ रा.आंबेडकर वसाहत,औंध) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे भीम दीप मित्र मंडळ जवळ चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार गजानंद सोनुने व संजय जाधव यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला (दि.२०) ताब्यात घेतले. त्याच्या कडून १०७ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी,दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन,घरफोडी करण्यात वापरलेले हत्यार असा एकूण सहा लाख रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील घरफोडी करणारा असून गेल्या महिन्यातच जेल मधून जामिनावर सुटला होता. सदर आरोपी विरोधात भा.द.वि. ४५४,४५७,३८० अंतर्गत समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहायुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सह पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस आमदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, प्रमोद कोकणे, गणेश थोरात यांनी केले आहे.












