पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१३ : पुणे शहरात जबरी चोरी,घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी युनिट- ६ कडून मोहीम राबवण्यात आली होती. या दरम्यान जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी २४ तासात अटक करण्यात आली आहे. ओंकार सुरेश गोसावी (वय २१ रा. भेकराईनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सदर आरोपी हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेट येथे थांबला असून त्याच्याकडे नं. प्लेट नसलेली दुचाकी आहे. अशी माहिती पोलीस अंमलदार ज्योती काळे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला व विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सदरचा गुन्हा अल्पवयीन साथीदाराने केला असल्याचे कबुली दिली. त्याच्या कडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच ५ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३ लाख ४७ हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीला १२ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सह पोलीस आयुक्त गुन्हे दोन सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश तागवाने, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केले आहे.












