पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : तब्बल ५ लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले दागिने आरोपींकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.ही घटना मुंढवा पोलिस स्टेशनच्या [ mundhwa police station ] हद्दीत घडली आहे.
अक्षय अशोक पंडित ( वय २८ रा.सद्गुरू अपार्टमेंट विश्रांतवाडी ) असे आरोपीचे नाव असून फिर्यादीने त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची [ crime ] नोंद केली होती.
फिर्यादी हे बिटी कवडे रोडवरील पाम ग्रुव्ह सोसायटी मध्ये राहण्यास आहेत. दि. ११ रोजी ते काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते.त्यावेळी एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील दहा तोळे सोन्याच्या अंगठ्या घरफोडी [burglary ] करून चोरून नेल्या आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी त्यांच्या घराचे नूतनीकरणाचे काम चालू होते.पोलिसांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास केला असता घराच्या नूतनीकरणासाठी आलेल्या एका मजुराने घरफोडी केल्याचे कबूल केले.त्याच्याकडून एकूण ५,००,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ना. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्री विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संदिप जोरे.. दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.












