पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १४ : दुचाकी चोरट्याला व घरफोडी करणाऱ्या एकाला मूढाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून १४ दुचाकी, घरफोडीतील सोने चांदी व रोख रक्कम असे एकूण ७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गोरख विलास धांडे (वय २० रा. इस्कॉन मंदिर, गोकुळ मंदिर, कात्रज) असे अटक कारणात आलेल्याचे नाव आहे. या आधी ही आरोपीवर दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
मुंढवा परिसरात अज्ञाता कडून चोरीस गेलेल्या दुचाकीचा तपास मुंढवा पोलिसांकडून सुरु होता. त्या दरम्यान दोन संशयित मुले चोरीची दुचाकी घेऊन साज कंपनी जवळ घोरपडी गावात फिरत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे व सचिन पाटील यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला घटना स्थळावरून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान विधिसंघर्षित बालकाने १४ दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पुणे शहरातील सात पोलीस स्थानकात १४ दुचाकी पैकी ११ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून तीन गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. कोंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड, तसेच पुणे ग्रामीण परिसरात लोणावळा, राजगड, सासवड या ठिकाणाहून दुचाकीची चोरी केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख, सह पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सह पोलीस निरीक्षक संदीप जोरे, दिनेश राणे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, स्वप्निल रासकर यांनी केले आहे.












