पुणे : देहूरोड येथील राऊत नगर या ठिकाणी राहणाऱ्या ४० वर्षीय राजू भीमा राठोड याने घरासमोरील झाडाला फास घेत आत्महत्या केली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांनी आपल्या राहत्या घरासमोरील झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पहाटे चार वाजताच्या सुमारास आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून त्वरीत पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. सकाळी 7.20 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तरी राजू याने आत्महत्या का केली असेल याचा तपास देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.












