पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : चंदन चोरीमध्ये भलतीच वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशीच एक घटना चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
अमिर दरवाजकर ( वय ३४ वर्षे रा. महादेवनगर, हडपसर, पुणे ) यांनी चार अनोळखी इसमां विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे मेट्रो लाईन सिक्युरिटी कंपनीमध्ये सेक्युरिटी ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. दि. ०७ रोजी मेट्रो लाईन सेक्युरिटी कंपनीच्या गेस्ट हाऊस च्या आवारातील २०,००० किमतीची दोन झाडे चार अनोळखी इसमांनी कापून चोरून गेली आहेत.
आरोपींवर भादवि कलम ३८२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय नांगरे हे करत आहेत.












