पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : पुणे शहरात चंदन चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी उमेश कसबेकर ( वय ४८, रा. कोरेगाव पार्क, पुणे ) यांनी दोन अज्ञात इसमां विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे कोरेगाव पार्क येथील मोरवी हाऊस मध्ये केअर टेकर म्हणून काम करतात. दि. १३ व १७ रोजी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी मोरवी हाऊसच्या आवारातील एकूण चार चंदनाची झाडे करवतीच्या साहाय्याने बुंध्यापासून कापून नेली आहेत.
आरोपींवर भादवि कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे हे करत आहेत.












