पिंपरी चिंचवड दि. 08 : गांजा विक्रीसाठी चक्क मोकळ्या जागेत दोन गांजाची झाडे लावण्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख परिसरातून उघडकीस आला आहे. १ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाचे दोन गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई (दि.४) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.
धनेश अनिरुद्ध शर्मा (वय ३४ रा.वाकवस्ती, पिंपळे निलख,मु.पो. मुसहरीबानार जि. गोपालगंज, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरून व लपून छापून अंमली पदार्थ, ड्रग्सची विक्री, साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस आयुक्तालया कडून आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सांगावी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप शेलार व मितेश यादव यांना बातमी मिळाली की कांतीलाल साठे यांच्या चाळीच्या मागे वाकवस्ती, पिंपळे निलख येथे मोकळ्या मैदानात एका इसमाने गांजाची दोन झाडे लावले असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडून दोन गांजाची झाडे जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -१ बाळासाहेब कोपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले,पोलीस उप निरीक्षक
राजन महाडिक, पोलीस अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, संतोष भालेराव, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, आकाश गारगोटे, कपिलेश इगवे, पांडुरंग फुंदे यांनी केले आहे.












