पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१४ : चतु:र्श्रुंगी पोलीस स्थानाच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.औदुंबर उर्फ मोन्या रविन्द्र नाकते (वय २७ रा. जनवाडी, गोखले नगर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सदर आरोपी चतु:र्श्रुंगी परिसरात काही साथीदारांसह धारदार शस्र, लोखंडी गज,अग्नी शस्र, या सारख्या जीवघेण्या हत्यारासह खुणाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्हेत सहभागी होता. आरोपी विरोधात मागील पाच वर्षांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली होती.
सदर आरोपी विरोधात पोलिसांनी एम पी डी ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची स्थानबद्धतेची ३० वी कारवाई आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी विजयकुमार पांढरे चतु:र्श्रुंगी पोलीस स्थानक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे पीसीबी गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पार पडले.












