चांदणी चौकातील संपूर्ण काम पूर्ण करण्याची “अधिकृत मुदत” महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी निश्चित करण्यात आली. मात्र, तोपर्यंत केवळ 80 टक्केच काम पूर्ण झाले होते. गेल्या 20 दिवसांतील कामाचा वेग पाहता आता 25 जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे अधिकारी सांगत आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौकात 397 कोटी रुपये खर्चून 17 किमीचा रस्ता बांधला आहे. यामध्ये रॅम्प, सर्व्हिस रोड, अंडरपास यासारख्या रस्त्यांचा समावेश आहे. चांदणी चौकातील एकूण कामांपैकी 90 टक्के काम आता पूर्ण झाले आहे. आता फक्त मुख्य पूल शिल्लक आहे.
बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल 150 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद असेल कारण पूर्वीचा पूल केवळ 50 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद होता. जुन्या पुलाचा पिलर अगदी रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. नवीन पुलासाठी बांधण्यात आलेले खांब रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणार असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही, हे संपूर्ण काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले की, “आता जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 मे पासून गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून चांदणी चौकातील सर्व मुख्य कामे 25 जुलैपर्यंत पूर्ण होतील.
चांदणी चौकातीळ पुलाचे काम २५ जुलैपर्यंत होणार पूर्ण












