तामिळनाडू दि. ०४ -: चांद्रयान – ३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी काऊंट डाऊन करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ एन.वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. भारताचे महत्त्वाची मोहीम चांद्रयान – ३ यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तमिळनाडूमधील अरियालूर येथे त्यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले आहे. दि. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आलेल्या चांद्रयान – ३ च्या प्रक्षेपणाचे उलटे काउंट डाऊन त्यांच्याच आवाजातील होते.
त्यांच्या या निधनाबद्दल इस्त्रोच्या अनेक शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकां कडून शोक व्यक्त केला जात आहे. श्रीहरीकोटा येथे झालेले काउंट डाऊन त्यांच्या आवाजातील शेवटचे काउंट डाऊन होते. अनेक स्तरांवरून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.












