पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२४ : चारीत्र्यावरील संशयावरून बायकोचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत भावाने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. २४ रोजी रात्री दोनच्या सुमारास राहत्या घरात आरोपी केशव भीमराव सीताफळे ( वय ४५, रा. पाटीलबुवा नगर, खराडी, पुणे ) याने स्वतःच्या पत्नीचा चारीत्र्यावरील संशयावरून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक भगवान कांबळे आणि सिद्धनाथ खांडेकर हे करत आहेत.












