चिखली येथील साने चौक या ठिकाणी असलेल्या सिद्धिविनायक ज्वेलर्स या दुकानाचे मालक व त्यांच्या भावाने मिळून ४४ लोकांची फसवणूक करून या लोकांना सुमारे १ कोट ५२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. एका पीडितेने या बाबतची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली पोलिसांनी गणेश आनंद हाके व दिनेश आनंद हाके (दोन्ही रा. शिवतीर्थ सोसायटी चिंचवड मूळ रा. हाकेवाडी ता.आटपाडी जी.सांगली) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता चे कलम ३१८(४), ३१६(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत संतोष महादेव थोरात वय ४१ रा. विकासनगर कीवाले यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेश हाके व दिनेश हाके यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी व त्यांच्या प्रमाणे एकूण ४४ लोकांचे विश्वास संपादन करून सोने गहाण ठेवीवर बँकेपेक्षा कमी व्याजदराने म्हणजेच १ टक्के व्याजदराने सोने गहाण ठेवून पैशे देतो असे अमिश दाखवून फिर्यादी व त्यांच्या साथीदारांचे सुमारे १ कोट ५२ लाख ६० हजार रु किमतीचे २१८ तोळे इतके वजनाचे सोन्याचे दागिने स्वतः जवळ गहाण ठेवुन घेवुन त्या लोकांना गहाण ठेवल्याबाबतचे कार्ड देवुन, दुकान बंद करून लंपास झाले. त्याच प्रमाणे यातील काही लोकं कडून गहाण ठेवलेल्या सोन्याची मूळ रक्कम परत घेवुन देखील त्यांना त्यांचे सोन्याचे दागिने परत दिले नाही. सोबतच काही लोकांकडून सोन्याचे नवीन दागिने बनवण्यासाठी पैशे घेवुन त्यांना दागिने बनवून दिले नाहीत अथवा त्यांचे पैशे परत दिले नाहीत. असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपस चिखली पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक बाबर करीत आहे.