पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या इसमाने चोरी सोबतच एका वयस्कर महिलेचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका महिलेने अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
एक वयस्कर महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने चोरीच्या उद्देशाने घराचे सिमेंटचे पत्रे फोडून आत प्रवेश केला. घरातील अवजड वस्तूने त्यांनी वयस्कर महिलेला ठार मारले. तसेच कपाटातील १,०४,५०० रुपये किमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन एवढा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.
आरोपीवर भादवि कलम ३०२,३९२,४५७,४२७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंब हे करत आहेत.












