जालना : राज्यात मराठ आरक्षणाचा मुदा पुन्हा एका तापला आहे. मराठ आंदोलकांनी जालन्यात एसटी बस पेटवून दिली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्क्श्र्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छञपती संभाजीनगर,जालना आणि बीड जिल्ह्यातील इटरनेट सेवा १० तास बंद राहणार आहे.
याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.सुरक्षेचा उपाय म्हणून जालना,बीड,आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे.