पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : जगभरातील रामलल्लाच्या भक्तांना कधी निराशेला सामोरे जावे लागले तर श्रीराम आपल्याला नेहमीच एक आशेचा किरण दाखवत असतात. त्यामुळे श्रीरामांसाठी आपणही आपले योगदान दिले पाहिजे ती संधी या वेबसाईटच्या माध्यमातून श्रीरामांच्या भक्तांना निर्माण होत आहे. ही वेबसाईट म्हणजे लोकांच्या मनाला जोडणारा धागा आहे. असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
हेरिटेज हॅन्ड विविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे श्रीरामांच्या भक्तांसाठी, समाजातील सर्व घटकांसाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना राबविण्यात येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले. यासाठी सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमात योगदान दिले पाहिजे असे अवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या आणि हेरिटेज हॅन्ड विविंग रिव्हायवल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच्या वेबसाईटचे उदघाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते बुधवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सौदामिनी हँडलूम्स या ठिकाणी करण्यात आले.
हेरिटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रमुख आणि या कार्यक्रमाच्या आयोजक श्रीमती. अनघा घैसास यांनी सांगितले की,
पुण्यात कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे दिनांक १० डिसेंबर २३ ते २२ डिसेंबर २३ रोजी हातमागाद्वारे सामूहिक रामवस्त्र विणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सर्व लोकांना आपल्या हाताने रामवस्त्र विणण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान श्रीरामांना केंद्रस्थानी ठेवून भजन, कीर्तन, प्रवचन आणि इतर संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे श्रीमती घैसास यांनी सांगितले. तसेच श्रीराम मंदिर प्रकरणाची न्यायालयात बाजू मांडणारे वकील श्री. रविशंकर प्रसाद आणि श्री. मदनमोहन पांडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले
याप्रसंगी, श्रीमती. अनघा घैसास, सौदामिनी घैसास, श्री. मिलिंद वेर्लेकर, श्री. चंद्रकांत कुडाळ, श्री. अजिंक्य कुलकर्णी उपस्थित होते.












