पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.२५ : जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा देहूरोड पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. सदर आरोपीं कडून आठ लाख ८६ हजर रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. देहूरोड, पिंपरी, रावेत प्रत्येकी एक व सांगवी, वाकड पोलीस स्थानकाकडील दोन असे सात गुन्हे उघडकीस आले आहे.
नागेश बाळू भंडारी (वय २० रा. म्हातोबा नगर, वाकड), निकिता किरण शिंदे (वय २२ रा सदर) व दोन अल्पवयीन साथीदार असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहूरोड परिसरात आर.के. कॉर्नर येथे गुरुवार दि.२० रोजी एका इसमाचा रिक्षेतून आलेल्या महिला व तीन इसमांनी मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेल्याच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान इतर साथीदारांच्या मदतीने गुरुवार दि.२० रोजी पूणवळा येथे एका इसमाचा मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले. तसेच थेरगाव, वाकड,सांगवी,पिंपरी परिसरातून चार ऑटो रिक्षा,व पिंपरी चिंचवड परिसरातून १८ मोबाईल फोन चोरी केल्याचे काबुल केले आहे.
सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, सहा पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परी-२ काकासाहेब डोळे,सह पोलीस आयुक्त पद्याकर घनवट, सह पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय ढमाळ,पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते,सुनील यादव,किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव,युवराज माने, सचिन सेजाळ, स्वप्नील साबळे, शुभम बावनकर, संतोष महाडिक, कैलास शिंदे, सागर कळमकर. संतोष भराट, सुनीता पटेकर, दीपाली शिंदे यांनी केली आहे.












