पुणे प्रतिनिधी
पुणे दि.८ : येरवडा परिसरात रात्रीच्या वेळी फोनवर गाणी ऐकत पायी जाणाऱ्याचा व्यक्तीचा मागून येणाऱ्या मोटार सायकलवरील तिघांनी मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जबरी चोरी करणाऱ्या तीन जणांना येरवडा पोलिसांनी अटक केले आहे.
दीपक चंद्रकांत मांडगे (वय २४ रा. मु.पो. ता. श्रीगोंडा, जि. अहमदनगर), तुषार बाळा साहेब रसाळ (वय २५ रा. मु.पो. ता. श्रीगोंडा, जि. अहमदनगर), राधाकिसन बबन साठे (वय ३० रा. वनिता झोपटपट्टी, कल्याणीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना रामवाडी मार्शलचे पोलीस अंमलदार संदीप जायभाये व सागर दळवी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि गुन्ह्यातील आरोपी कल्याणीनगर परिसरात येणार असल्याचे कळले. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर ठिकाणाहून पळून जात असताना पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडले. चौकशी दरम्यान आरोपींनी सदरचा गुन्हा कबुल केला असून पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.
सदाची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रदीप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, शेख, जगदाळे, डुकरे, खाटमोडे, शिंदे, परदेशी, ओंबासे, शिंदे, कांबळे, भोसले, दळवी यांनी केले आहे.












