पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ३० : जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक व जाळपोळ करण्यात आल्याची घटना आज (दि. ३०) रोजी घडली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील अनेक दिवसांपासून जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे, त्यांच्या आंदोलनाला समर्थन देत राज्यभरातून मराठा समाज साखळी आंदोलन राबवत आहे, मात्र आज त्यांच्या समर्थकांनी असा पाऊल उचलला आहे, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तेथील दगडफेक व जाळपोळ करणाऱ्या लोकांना बाहेर काढले आहे.
या घटनेची माहिती आगीसारखी सर्वत्र पसरली असून या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथील खासदार व आमदार यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे. सर्व खासदार व आमदार यांच्या कार्यालय व निवासस्थानाच्या बाहेरही सुरक्षा तगडी करण्यात आली असून कोणतेही दौरे आणि कार्यक्रम न घेण्याचे त्यांना आव्हान करण्यात आले आहे.












