२६ जुन हा जागतिक अंमली पदार्थ दिन म्हणुन विविध देशामध्ये साजरा केला जातो. केंद्र सरकारने सुध्दा यावर्षी २६ जुन जागतिक अंमली पदार्थ दिन मोठया प्रमाणावर साजरा करावयाचे ठरवले आहे. २०४७ सालापर्यंत भारत देश हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ठ ठेवुन त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत सर्व सरकारी यंत्रनांना सुचना दिल्याने सर्व यंत्रना सज्ज झाली आहे.
या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी या कामास प्राधान्य देवुन पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी चालु वर्षामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकुण ५८ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकुण सात कोटी चोवीस लाख एकोनिस हजार चारशे पाच रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एकुण ८२ आरोपी अटक केले आहेत.
तसेच पुणे पोलीस आयुक्तालया मार्फत पुणे शहरामध्ये २६ जुन २०२३ पासुन पुणे शहरातील नागरिक, विद्यार्थी तसेच तरुण युवकांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणा-या दुष्परिणांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालय येथुन शालेय विद्यार्थ्यांची “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती ” दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची दिंडी सकाळी ०९/०० वा मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री.संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा.श्री.अरविंद चावरीया अपर पोलीस आयुक्त प्रशासन, मा. श्री. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे, यांचे हस्ते दिपप्रज्वलन होवुन पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथुन निघणार आहे.
सदरची दिंडी हि किराड चौक, ब्ल्यु नाईल चौक, इस्कॉन मंदिरापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एम. जी. रोड अशा प्रकारे कॅम्प परिसरातुन फिरुन पुन्हा पोलीस आयुक्त कार्यालय येथे येवुन संपनार आहे. तसेच पुणे शहरातील विविध शाळा, कॉलेजमधुन अंमली पदार्थ विरोधी फेरी काढणे अंमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हिच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अंमली पदार्थाचे दुष्परिणामा बांबत पथनाटयाचे आयोजन करणे, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अंमली पदार्थाचे सेवन न करण्या बाबत या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे तसेच शाळा, कॉलेज याठिकाणी विद्यार्थ्यांना व्याख्यानाव्दारे अंमली पदार्थाच्या सेवनाने होणा-या दुष्परिणांमाबाबत अंमली पदार्थाचे अवैद्य विक्रीस आळा घालणे बाबत जनजागृती करणे तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी चौकामध्ये बॅनर्स, पोस्टर्स लावुन जनजागृती करणे व फेसबुक, व्टिटर इत्यादी सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फतीने जनजागृती करणे, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, सदर जनजागृती अभियान पुणे शहर आयुक्तालया मार्फत पुढील दोन महिने राबविण्यात येणार आहे.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्त पुणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन












