पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : जागतिक न्याय दिनानिमित्त [ world justice day ] दि. १७ रोजी नेहरूनगर, पिंपरी येथील नविन कोर्टात वृक्षारोपण सोहळा [ tree planting ] साजरा करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशचे [ pimpri – chinchwad advocate bar association ]अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणी मार्फत नविन कोर्ट आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास नेहरूनगर पिंपरी कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश [ chief justice ] मा. आर. एस. वानखेडे साहेब, तसेच सह न्यायाधीश मा. आर. एम. गिरी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वृषारोपण प्रसंगी पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. अक्षय केदार, ॲड. ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. नितिन पवार तसेच पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड. विलास कुटे, मा. अध्यक्ष ॲड. सुदाम साने, मा. अध्यक्ष राजेश पुणेकर, मा. उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. पूनम राऊत, ॲड. संगीता कुसाळकर, ॲड. सुषमा बोरसे, ॲड. चित्रा फुगे, ॲड. काळभोर, नायर, लोढा व इतर वकील [ advocate ] बंधू भगिनी उपस्थित होते.
बार असोसिएशन तर्फे मा. न्यायाधीश वर्ग यांचा फुलांच्या कुंड्या देऊन सत्कार करण्यात आला.तसेच बहूगुणी अश्या देशी वंशाची कडुनिंबाची झाडे लावण्यात आली. सदर वृक्षारोपणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे [ pimpri – chinchwad muncipal corporation ] विशेष सहकार्य लाभले.












