पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जागतिक व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधुन पूर्व प्रादेशिक विभागांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले.
व्यसनमुक्ती अभियानामध्ये पूर्व प्रादेशिक विभागाचे एकूण १४ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी एकाच दिवशी १७५ वेग-वेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये एकूण १ लाख १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, सेवकवर्ग यांना व्यसनमुक्ती संबंधाने माहिती देवून मार्गदर्शन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, काही ठिकाणी त्यांचे पालक ही उपस्थित होते. एकंदरीत पुणे शहरातील जवळपास एक ते दिड लाख लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश एकाच दिवसात पोहोचविण्याचे काम पुणे शहर पोलीस दलाकडून शक्य झाले आहे.
तसेच यापुढेही सायकल रॅली, पथनाटय, मिनी मॅराथॉन, इ. वेग-वेगळे सामाजिक उपक्रम / जनजागृती अभियान राबवून पुणे शहर व्यसनमुक्त करण्याचा संकल्प पोलीसांकडून करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने यापुढेही अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम वेळो-वेळी राबवून व्यसनमुक्तीचा
नागरीकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये मार्गदर्शन सत्राचे आयोजन












