गुहागर : गुहागर येथील सभेसाठी नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे चिपळूण शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे.
भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी गुहागरमध्ये करण्यात आले होते. त्या सभेसाठी मुंबईहून आलेल्या नीलेश राणेंच्या ताफ्यावर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दरम्यान, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.