पुणे : एकीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी पुणे शहर पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. खंडणी विरोधी कक्षाने चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या गुंडाला पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी सेल 2 ला या गुंडाची माहिती मिळाली आणि त्यावर कारवाई करत त्यांनी पुण्यातील उरुळी देवाची परिसरातून रेकॉर्डवरील गुंडाला अटक केली. त्याच्याकडून चार जिवंत काडतुसे व इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच ४२ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
साहस विश्वास पोळ (२४) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर आयपीसी कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात फिर्यादीला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.












