पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि दैनिक राज्य लोकतंत्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोज विविध विषयांवरील व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात येत असते.
आज या व्याख्यान सत्राच्या पाचव्या दिवशी पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे दि. 19 रोजी दुपारी 2 वाजता सौ. शुभांगी गिरमे ( लॅब टेक्निशियन ) यांच्या जीवन जगण्याची कला ह्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, ॲड. शीला उत्तमराव दळवी, ॲड.सारिका रणदिवे, ॲड. पोर्णिमा मोहिते, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड. नीलम जाधव, ॲड. ऐश्वर्या शिरसाठ, ॲड. जयश्री गोरे, ॲड. गीतांजली जाधव, ॲड. साक्षी धुमाळ, ॲड. सोनाली एम. दहादास, ॲड. स्वाती व्हि. बारकुल, ॲड.सोनाली गुंजाळ, ॲड. बुसरा एम. पठाण, ॲड. कविता गोरे, ॲड.मोनिका गाढवे, ॲड. मानसी उदासी, ॲड.पूजा बढे, ॲड. वैशाली जाधव आदी उपस्थित होत्या.
सौ. शुभांगी गिरमे यांनी एक आनंदी जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे हे पटवून दिले. आनंद हा आपल्या आत सामावलेला असतो पण तो आपण सर्वत्र शोधत असतो.फक्त पैसा, वस्तू किंवा माणसावर आनंद अवलंबून नसतो. आनंद कमी होण्याचे कारण म्हणजे आपल्या आयुष्यातील तणाव.
प्रत्येकाचा ताण हा वेगवेगळा असू शकतो. सर्वात जास्त त्राण हा स्त्रीला असतो.जेव्हा आपल्या मनावर ताण येतो तेव्हा आपली इम्मुनिटी सिस्टीम निकामी होऊन जाते. ही इम्मूनिटी सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी आपल्याला ध्यान आणि प्राणायम करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, एनर्जी वाढवण्यासाठी आहार,श्वास,आणि झोप ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. श्र्वासाने आपण एकमेकांशी संलग्न राहू शकतो. मन स्वच्छ करण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. मन : शांती साठी घरात अध्यात्मिक वातावरण असायला हवे.
या व्याख्याना दरम्यान अनेक वकील बंधू आणि भगिनींनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी आयुष्य, साधना, ताण आणि मनावरील नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री विलास कुटे यांनी उपस्थित वक्त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.












