पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : अल्पवयीन मुलांनी तरुणास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
आकाश संजय ठोंबरे ( वय २०, रा. पांडव नगर,चक्रपाणी वसाहत, भोसरी ) या तरुणाने गणेश कृष्णा गवारे ( वय १९, रा.महादेव नगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी ) याच्यासह ५ अल्पवयीन मुलां विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. २३ रोजी अल्पवयीन मुलांनी फिर्यादी यांच्या मित्रास जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण कोयत्याने छातीवर,डोक्यावर,पाठीवर वार केले.फिर्यादी यांच्या मित्राला मारहाण करत बियरची बाटली फोडून त्याच्या पाठीत खुपसली.तसेच त्यास काटा – चमच्याने वार करत जखमी केले आहे.
आरोपींवर भादवी कलम ३०७,१४३,१४८,१४९,३४ मुंबई पोलिस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ),भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आरोपींना ताब्यात घेण्यात आले नसून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भवारी हे करत आहेत.












